काव्य लेखन स्पर्धचा बक्षीस वितरण व मार्गदर्शन कार्यशाळा दि. 28-09-2018 रोजी नोएल स्कुलमध्ये काव्यलेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला व त्याच बरोबर मुलांना मार्गदर्शन सुदधा करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्पणा डोंगरे मॅडम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री अमोल गोंडचवर सर लाभले होते श्री रोहित हिवरकर सर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत इयत्ता 4 थी ते इयत्ता 10 च्या एकुण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता 4 थी चा विद्यार्थी स्वराज बहाकर तर व्दितीय धनश्री बिड़कर तर तृतीय क्रमांक यश विभुते यांनी पटकावला तर प्रोत्साहनपर बक्षीस कुलदिप पाटकर यांने पटकावला विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानीत करण्यात आले काव्यलेखन कसे करावे या संदर्भात प्रमुख मार्गदर्शक असलेले अमोल गोंडचवर सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री रोहित हिवरकर सर यांनी केले कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले एकदंरीत कार्यक्रमाला मुलांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला.