दि. 15 जून 2019 रोजी नोएल स्कूलमध्ये इयत्ता 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी ” विद्यार्थ्यांच्या समस्या व उपाय ” या विषयावर कार्यशाळा पार पाडली. या कार्यशाळेसाथी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोल्यातील सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ डॉ. राधिका केळकर मॅडम तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या प्राचार्य सौ. अर्पणा डोंगरे मॅडम व श्री. अनोश मनवरसर उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरवातीला पर्यवेक्षिका सौ. सोनाली देशपांडे मॅडम यांनी कार्यशाळेची रूपरेषा व उद्देश मुलांसमोर ठेवला. त्यानंतर डॉ. राधिका केळकर मॅडम यांनी मुलांच्या समस्या जाणून घेतल्या व मुलांच्या समस्यांवर उपाय सुचवत मार्गदर्शन केले. यामध्ये मुलांनी आपल्या अभ्यासाची गती कशी वाढवावी आपल्या आत्मविश्वास कसा वाढवावा, अभ्यासाचे नियोजन , सोशल मीडियाचा वापर इत्यादी विषयांवर मुलांना विस्तृत स्वरुपात सखोल मार्गदर्शन केले या कार्यशाळेला मुलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. सोनाली देशपांडे मॅडम यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदाचे व शाळेच्या संपूर्ण कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
नोएल स्कूलमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा