Class 8 to 10 – List of Textbooks and Notebooks 2024-2025
नोएल स्कूलची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
‘ध्येयाने असा संघर्ष करा की तुमचे यश गर्जना करेल.’ अशाव ध्येयाने प्रेरीत नोएल स्कूल ने याही वर्षी आपल्या १०० % निकालाची परंपरा कायम राखली. आपल्या या १०० % निकालासाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या अथक परिश्रमावे फळ म्हणजे हा लागलेला उत्कृष्ट निकाल.
शाळेच्या या उत्कृष्ट निकालासाठी शाळेच्या प्राचार्या सौ अर्पणा डोंगरे मॅडम यांनी वेळोवेळी केलेले मोलाचे मार्गदर्शन व दिलेले प्रोत्साहन प्रेरणादायी ठरले, त्याचीच परिणीती १००% निकालात फलद्रुप झालेली दिसत आहे. शाळेचा निकाल खालील प्रमाणे
यावर्षी परीक्षेला १७९ विद्यार्थी बसले, सगळे विद्यार्थी अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाले
बेस्ट ऑफ ५ नुसार शाळेचा सरासरी निकाल:
९०% च्या वरती २९, ७५% च्या वरती १०१, ६०% च्या वरती ४४
शाळेचे गुणवंत विद्यार्थी:
पहिला क्रमांक मंजीरी दिलीप देशमुख – 98.40%, दुसरा क्रमांक श्रावस्ती अजय जाधव – 96.40%, तिसरा क्रमांक अथर्व भानुदास ढोरे – 96.20%
मंजीरी देशमुख ने सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण, गणित या विषयात १०० पैकी ९९ गुण अर्थव ढोरे, सोशल सायन्स या विषयात १०० पैकी ९९ गुण अपूर्वा तायडे, मराठी या विषयात १०० पैकी ९७ गुण मंजीरी देशमुख, हिंदी या विषयात १०० पैकी ९६ गुण मंजीरी देशमुख, इंग्रजी या विषयात १०० पैकी ९४ गुण श्रीशय देशमुख यांनी घेतले.
शाळेच्या या उत्कृष्ट निकालाचे श्रेय शाळेच्या सहसंस्थापिका स्व . श्रीमती सुरेखा मनवर मॅडम, शाळेवे डायरेक्टर श्री अनोश मनवर, शाळेच्या प्राचार्या सौ अर्पणा डोंगरे तसेच प्राचार्य श्री अनुल मनवर व शाळेच्या सर्व शिक्षक वृदांना जाते. या निकालासाठी शाळेच्या शिक्षिका सौ अलका पाटील, सौ सोनल शर्मा, सौ प्राची मंगरूळकर, सौ उज्ज्वला घोगरे, सौ श्वेता पाटील, सौ पुष्पलता चोपडे, सौ प्रिया भोले, सौ गायत्री नरवैया, सौ शितल काळे, कु तृप्ती देशमुख, श्री आकाश बुलूकले, श्री शरद सर आणि सुपरवायझर सौ सोनाली देशपांडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. १० वी च्या उत्कृष्ट निकालासाठी सर्व पालक व विद्याश्यवि व शाळेचे हार्दिक अभिनंदन !
मुख्याध्यापिका.
सौ अर्पणा डोंगरे